Dhule Crime : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीत लाचखोरीची वाळवी; 1500 रुपये मागणाऱ्या वनरक्षकाला अटक

दुष्काळी मदतीसाठी वनहक्काची कागदपत्रे देण्याकरिता लाच; शिरपूरमधील वनरक्षक रंगेहात अटकेत
Shirpur Forest Guard Bribe Case
Shirpur Forest Guard Bribe CaseAI
Published on: 
Updated on: 

Shirpur Forest Guard Bribe Case

धुळे : दुष्काळी मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेली वनहक्काची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर तालुक्यातील सांगवी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राहुल बहिरम असे या वनरक्षकाचे नाव असून, १५ शेतकऱ्यांच्या अर्जांसाठी प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे एकूण १ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत आले आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर मदत देण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करणे, पंचनामे करणे आणि विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांकडून लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Shirpur Forest Guard Bribe Case
Dhule News | सोनगीर ग्रामीण रुग्णालय कर्मचारी बदली प्रकरण; चार सदस्यीय चौकशी समिती गठित

१५ अर्जांसाठी मागितली लाच

या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांना उदरनिर्वाहासाठी वनविभागाकडून राखीव शेतजमीन मिळाली आहे. शिरपूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने दुष्काळी निधी मिळवण्यासाठी वनहक्काशी संबंधित कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यानुसार तक्रारदाराने आपल्या वडिलांसह वकवाड गावातील अन्य १४ शेतकऱ्यांचे अर्ज सांगवी वनपरिक्षेत्र कार्यालयात वनरक्षक राहुल बहिरम यांच्याकडे जमा केले होते.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदाराने बहिरम यांची कार्यालयात भेट घेऊन अर्जांबाबत विचारणा केली. त्यावेळी बहिरम यांनी प्रत्येक अर्जासाठी १०० रुपये याप्रमाणे १५ अर्जांचे एकूण १ हजार ५०० रुपये मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

Shirpur Forest Guard Bribe Case
Dhule News : लोंढे नाल्याजवळ अपघात झाल्याने नागरिकांचा रास्ता रोको, आमदार राम भदाणे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

सापळा रचून रंगेहात पकडले

तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, वनरक्षक बहिरम यांनी पंचांसमक्ष १५ अर्जांसाठी १ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईचे नियोजन केले.

पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकात राजन कदम, पोलीस हवालदार मुकेश अहिरे, मकरंद पाटील आणि रामदास बारेला यांचा समावेश होता. सापळा कारवाईदरम्यान पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षक राहुल बहिरम यांना रंगेहात पकडण्यात आले.

Shirpur Forest Guard Bribe Case
Dhule News : राज्य सरकारने दुष्काळाचा फसवा अध्यादेश काढला! उबाठा शिवसेनेचे धुळ्यात आंदोलन

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून कागदपत्रांच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा प्रकार उघड झाल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news