Dhule Burglary | शिरपूर तालुक्यात घरफोडी; ९ तोळे सोने, ५० भार चांदी लंपास

शिरपूर तालुक्यातील खामखेडा प्रथा येथील घटनेने खळबळ
Gold Jewellery Stolen Shirpur
Gold Jewellery Stolen ShirpurPudhari
Published on
Updated on

Gold Jewellery Stolen Shirpur

सोनगीर (धुळे) : शिरपूर तालुक्यातील खामखेडा प्रथा येथे गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरातून ९४ ग्रॅम सोने, ५० भार चांदी आणि ५० हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खामखेडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर भालेराव पाटील (वय ५४) यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यामुळे पाटील कुटुंब रात्री १० वाजेच्या सुमारास दररोज प्रमाणे जेवण आटोपून घराला आतून कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते.

Gold Jewellery Stolen Shirpur
Dhule Heatwave | धुळ्याचा पारा 45.1 अंशावर: शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात नियंत्रण कक्ष सुरु

सकाळी खाली आल्यावर पाटील कुटुंबियांना दरवाज्याचे कुलूप गायब असल्याचे लक्षात आले. घरात काहीतरी झाल्याचे संशय आले असता त्यांनी मधल्या खोलीत जाऊन पाहिले तर कपाट कॉट व सुटकेस मधील साहित्य अस्ताविस्त आढळले.

तपासणी केली असता कपाटात ठेवलेली सुमारे ५० हजार रुपये रोख, ९४ ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० भार चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात चोरट्यांनी घराचे कुलब तोडून आत प्रवेश करत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे समोर आले.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news