Dhule Crime | अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचे चित्रीकरण व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार
Minor Girl Harassment
Minor Girl HarassmentFile Photo
Published on
Updated on

Shindkheda Minor Girl Harassment

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमठाणे येथील एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेचे चित्रीकरण मोबाईल फोनमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्हिडिओ काही मोबाईल माध्यमांतून प्रसारित करण्यात आल्याचेही उघड झाले.

Minor Girl Harassment
Dhule crime | खूनातील मयताच्या अंत्ययात्रेत आरोपीच्या घरावर तुफान दगडफेक; संतप्त जमावाविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि प्राथमिक चौकशी केली.

त्यानंतर संबंधित दोघांविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींच्या भूमिकेची तसेच व्हिडिओ प्रसारित होण्यामागील बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news