Illegal Liquor Raid | शिंदखेडा तालुक्यात गावठी दारू अड्ड्यावर छापा; अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Dhule Police Action | घटनास्थळी धाड टाकून अवैध गावठी दारू तयार करण्याचे साहित्य आणि साठा नष्ट
Shindkheda Illegal Country Liquor Raid
Shindkheda Illegal Country Liquor RaidPudhari
Published on
Updated on

Shindkheda Illegal Country Liquor Raid

सोनगीर (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी तसेच डांगुर्णे गावामध्ये सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीवर शिंदेखेडा पोलिसांनी कारवाई करत अवैध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. शिंदखेडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी छापे टाकत गावठी दारू बनविण्याचे बेकायदेशीर धंदे उद्ध्वस्त केले.

या कारवाई दरम्यान पोलीस शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डोके, पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल कलीम पटेल, शिरीश चौधरी, पूनमचंद कोळी तसेच जिग्नेश मोरे यांनी कारवाई केली.

Shindkheda Illegal Country Liquor Raid
Dhule Burglary | शिरपूर तालुक्यात घरफोडी; ९ तोळे सोने, ५० भार चांदी लंपास

पथकाने घटनास्थळी धाड टाकून अवैध गावठी दारू तयार करण्याचे साहित्य आणि साठा नष्ट केला. यावेळी प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव यांनी नागरिकांना आव्हान केले की, शिंदखेडा तालुक्यात व परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या धडक कारवाईमुळे गावठी व अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने पोलिसांच्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shindkheda Illegal Country Liquor Raid
Dhule Heatwave | धुळ्याचा पारा 45.1 अंशावर: शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात नियंत्रण कक्ष सुरु

एकूणच शिंदेखेडा पोलिसांनी घेतलेल्या या ठोस पावलामुळे अवैध दारू व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news