Dhule Crime | तरुणाची दगडाने ठेचून हत्या; एक संशयित ताब्यात

शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे शिवारातील घटना
 Crime News
Crime News Pudhari
Published on: 
Updated on: 

Shindkheda Youth Death

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे शिवारात एका तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिंदखेडा ते दोंडाईचा रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलच्या मागे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी दोंडाईचा पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राह्मणे शिवारात हॉटेलच्या मागील बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख ब्राह्मणे येथील रावसाहेब शांताराम चव्हाण (वय ४३) अशी पटली.

 Crime News
Dhule News |धुळ्यात सोशल मीडियावरील पोस्टमुळे वातावरण चिघळले! महापौरांच्या अपमान प्रकरणात गोरक्षक संजय शर्मा यांना अटक

घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड आढळून आला. तसेच चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अनुषंगाने एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दोंडाईचा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.