Dhule Crime | साक्रीत पशुवैद्यकीय विभागाच्या जुन्या इमारतीत महिलेचा खून

डोक्यावर टणक वस्तूने वार केल्याचा प्राथमिक अंदाज; मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू
 Crime News
Crime News Pudhari
Published on: 
Updated on: 

Sakri Woman Death News

धुळे : साक्री शहरातील पशुवैद्यकीय विभागाच्या जुन्या इमारतीत एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा आढळून आल्या असून, टणक वस्तूने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री येथील पशुवैद्यकीय विभागाच्या जुन्या इमारतीच्या एका भागात महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी रक्ताने माखलेला कडप्पा दगडाचा तुकडा आढळला आहे. या दगडावरही रक्ताचे डाग असल्याने त्याचा वापर हत्येसाठी करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

 Crime News
Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील वन विभागाच्या क्षेत्रातून 7 कोटी 67 लाख रुपयांचे गांजाचे पीक उध्वस्त!

प्राथमिक तपासात मृत महिला कचरा वेचण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तिचे नाव अनिता असल्याचे सांगण्यात येत असले, तरी तिची संपूर्ण ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

मृत महिलेच्या संपर्कात रमेश नावाची व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तोदेखील कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे समजते. या व्यक्तीचा हत्येशी संबंध आहे का, या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे. मात्र, या प्रकरणातील संशयिताची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 Crime News
Dhule Crime | नागपूर-सुरत महामार्गावर डिझेलचा काळाबाजार; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन पोलीस अधिकारी ओंकार गवळी यांच्यासह साक्री पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हत्येमागील कारण शोधण्यासह आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख आणि हत्येमागील नेमके कारण उघड झाल्यानंतर या प्रकरणाला अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news