Dhule Accident | दर्शनाहून परतताना भीषण अपघात; धमनार येथील दोन भाविकांचा मृत्यू, १० जण जखमी

साक्री तालुक्यातील धमनार येथील भाविक जैतोबा येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना अजनाळे गावाजवळ अपघात
Sakri Taluka Dhamnar Devotees Accident
भाईदास माळी, वकील सोनवणेPudhari
Published on
Updated on

Sakri Taluka Dhamnar Devotees Accident

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील धमनार येथील भाविक जैतोबा येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना अजनाळे गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत धमनार येथील भाईदास दशरथ माळी (वय ४४) आणि वकील बाळू सोनवणे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच ते दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

धार्मिक कार्यक्रमानंतर भाविक परतीच्या प्रवासाला निघाले असताना अजनाळे गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की, दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागून येणाऱ्या ग्रामस्थांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Sakri Taluka Dhamnar Devotees Accident
Dhule Shivaji Market | धुळ्यातील ऐतिहासिक शिवाजी मार्केट अखेर जमीनदोस्त; व्यापाऱ्यांचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

घटनेची माहिती मिळताच आमदार मंजुळा गावीत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. दरम्यान, मृत भाईदास माळी आणि बाळू सोनवणे यांच्यावर धमनार येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुःखद घटनेमुळे धमनार गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील अनेक घरांमध्ये चूलही पेटली नसल्याचे चित्र होते. अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात मोठी गर्दी केली.

Sakri Taluka Dhamnar Devotees Accident
Dhule Crime | हत्याराची तस्करी उधळली; गावठी कट्टा व जिवंत काडतुसेसह दोघांना अटक

मृत भाईदास माळी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. तर बाळू सोनवणे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. अत्यंत कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या दोघांच्या अकाली निधनाने धमनार गावावर मोठा आघात झाला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news