Dhule Crime | हत्याराची तस्करी उधळली; गावठी कट्टा व जिवंत काडतुसेसह दोघांना अटक

मुंबई-आग्रा महामार्गावरील अभय कॉलेज परिसरात सापळा रचून कारवाई
Weapon Smuggling Foiled Dhule
Weapon Smuggling Foiled DhulePudhari
Published on
Updated on

Weapon Smuggling Foiled Dhule

धुळे : विना परवाना गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध हत्यारांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य तस्कराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना धुळे शहरात अवैध हत्यारांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील अभय कॉलेज परिसरात सापळा रचला.

Weapon Smuggling Foiled Dhule
Dhule crime : शिरपुर तालुक्यात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई; ७ लाख ५३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

या कारवाईत सोमनाथ भिका पाटील (रा. देवभाने, ता. धुळे) आणि दीपक दगडू जगताप (रा. साईप्रसाद कॉलनी, अभय कॉलेजजवळ, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीदरम्यान एक गावठी कट्टा (पिस्टल) आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दोघेही हे अवैध शस्त्र विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपी सोमनाथ पाटील याच्याकडून दीपक जगताप हा सदर शस्त्र खरेदी करणार असल्याची बाब समोर आली आहे. या दोघांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५, ५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Weapon Smuggling Foiled Dhule
Dhule crime : धुळ्यात आईचे सोने हडप करण्यासाठी खोटी फिर्याद देणाऱ्या महिलेस अटक

दरम्यान, गेल्या २० दिवसांत धुळे शहरातील अवैध शस्त्रांविरोधातील ही तिसरी, तर जिल्ह्यातील चौथी मोठी कारवाई ठरली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींना शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य तस्कराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news