Dhule Crime News | धुळ्यात सोनसाखळी चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

शहरातील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये पाठलागाचा तब्बल दीड तास थरार
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

धुळे : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून पळ काढणाऱ्या पर राज्यातील दोघा चोरट्यांना तब्बल एक ते दीड तास पाठलाग करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने अटक केली आहे . शहरातील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये हे दोघे चोरटे दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलीस पथकाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

देवपूर परिसरातील वानखेडकर नगर मध्ये राहणाऱ्या आकांक्षा भरत बोरसे या त्यांच्या मुलीला ट्युशन वरून घरी आणण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर वरील दोन चोरट्यांनी त्यांच्या गर्भावस्थेचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून त्यांना शारीरिक इजा होईल या इराद्याने धक्का देऊन खाली पाडून मोटर सायकलने पळ काढला होता.

या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील त्यांच्या पथकास तात्काळ पूर्ण शहरात काळ्या पल्सर मोटर सायकल व त्यावरील दोन इसमांची माहिती देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील उपनिरीक्षक अमरदीप मोरे , हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, चेतन बोरसे, धर्मेंद्र मोहिते, हर्षल चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सुशील शेंडे अशांच्या शोध पथकाने मोटर सायकलींने धुळे शहरातील जुनी महानगरपालिका, फुलवाला चौक, गांधी पुतळा अशा ठिकाणी आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गांधी पुतळा येथे मिळालेल्या वर्णन प्रमाणे दोन इसम काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलने वेगात जाताना दिसले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला.

संशयित गिंडोडिया चौक कडे गेल्याबाबत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना लागलीच माहिती कळवुन आरोपींचा शोध सुरू केला . त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करताना आरोपींचे शहराबाहेर पळून जाण्याचे सर्व संभाव्य रस्ते ब्लॉक करण्या बाबत पथकास सूचना दिल्या. व पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकातील अंमलदार मनोज साठे व किरण साळवे यांना देखील माहिती कळविली. त्यानुसार पोलीस अंमलदार मनोज साठे व किरण साळवे यांनी देखील आरोपींचा पाठलाग सुरू केला.

आरोपींना आपला पाठलाग होत असल्याचे पाहून आरोपी भरधाव वेगात गिडोडिया चौकाकडे गेले. म्हणून शोध पथकाने आरोपींचा पाठलाग सुरू केला. तेव्हा आरोपी हे वाखारकर नगर चौका कडे पळाले. तेथे पोलीस पथकातील चेतन बोरसे व कमलेश सूर्यवंशी यांनी त्यांची मोटर सायकल आडवी करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने पोलिसांना कट मारून भगा मोहन नगर कडे पळाले. तेव्हा दुसऱ्या पथकातील हर्षल चौधरी व राहुल गिरी यांनी समोरून येऊन अटकाव केला असता, आरोपींनी त्यांची मोटर सायकल अटकाव करणाऱ्या पोलीस अंमलदार हर्षल चौधरी व राहुल गिरी यांच्या मोटर सायकलवर जाऊन धडक दिली.

यादरम्यान दोन्ही पोलीस व आरोपी खाली पडले. तेव्हा पोलीस पथकातील दोन्ही अंमलदारांना दुखापत झालेली असताना देखील त्यातील एका आरोपीस पकडले व दुसरा आरोपी मोटर सायकल सोडून अंधाराचा फायदा घेऊन रहिवासी भागात पळून गेला. पथकातील उपनिरीक्षक अमरजीत मोरे, शशिकांत देवरे, प्रशांत चौधरी, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे अशांनी लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यास दाता सरकार मंगल कार्यालय जवळ शिताफीने पकडले. दोन्ही आरोपींचे ताब्यातून एक मंगलसूत्र, काळ्या रंगाची बॅग व काळ्या रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक एम एच ०३ इ वाय ८५२३ ही हस्तगत करण्यात आली आहे.

अशाप्रकारे दोन्ही आरोपींचे ताब्यातून एकूण 1 लाख 82 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत, पल्सर मोटर सायकल बॅग व आरोपींचे कपडे, कॅप, 2 मोबाईल व हेल्मेट मिळून आले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटर सायकल ही कोपरखैरणे नवी मुंबई येथून दिनांक ५ जानेवारी रोजी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

आरोपी संजू मुकेश शर्मा यांच्या विरुद्ध उरबान इस्टेट रोहतक पोलीस ठाणे हरियाणा राज्य येथे चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नितीन कुमार किसन कुमार यांच्या विरुद्ध गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस ठाणे रोहतक हरियाणा राज्य येथे दरोडाचा गुन्हा दाखल असून तो 2025 मध्ये 6 वर्ष शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news