

धुळे : व्यावसायिकासोबत आलिंगनाचे व्हिडीओ बनवून , व्हिडीओ व्हायरल करण्याची व बलात्काराची खोटी फिर्याद देण्याची धमकी देवून 20 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात घेतले आहे. यातील टोळीप्रमुख असणारा नरेश गवळी हा नाशिक येथील कारागृहात एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध झाला होता. मात्र तेथून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू केल्याची बाब उघडकीस आली आहे. आता या टोळीतील म्होरक्या आणि सदस्यांना अटक झाल्यामुळे त्यांनी नेमके किती लोकांना अशा पद्धतीने फसवले ही बाब स्पष्ट होणार आहे.
धुळे शहरातील व्यावसायिक असणाऱ्या एका जणास एका तरुणीने तिचे नोकरी बाबत बोलणे करावयाचे असल्याने सांगुन फिर्यादीस धुळे शहरातील देवपूर मधील एका कॉलनीतील घरात घेवून गेली. तेथे अलिंगन देत लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे तरुणीचे टोळीतील नरेश कांतीलाल गवळी ( रा. नरडाणा चौफुली, देवपूर धुळे), रविंद्र अशोक डोंगरे व त्यांचे सोबतच्या अनोळखी इतर 2 महिला व 3 पुरुष यांनी तरुणी सोबत फिर्यादीचा व्हिडीओ बनविला. हा व्हिडीओ फिर्यादीचे मित्र परिवार व नातेवाईकांना पाठविण्याची तसेच बलात्काराची खोटी फिर्यादी देण्याची धमकी देवून फिर्यादीकडे 20,लाख रुपये खंडणीची मागणी करुन फिर्यादीस मारहाण केली.
या प्रकारामुळे फिर्यादीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासमोर घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर या प्रकारात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश केल्याने
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष येथील महिला अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, सपोनि मिना तडवी, पोउनि चेतन मुंढे व पोलीस अंमलदार अनिता पवार, शशिकांत देवरे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, पवन गवळी, विवेक वाघमोडे, राहुल गिरी व सुशिल शेंडे या पथकास फिर्यादीसोबत घटनास्थळी पाठविले. तेथे नरेश गवळी, रविंद्र अशोक डोंगरे व तरुणी यांना ताब्यात घेतले.
यासंदर्भात देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख नरेश गवळी हा एमपीडीए कायद्याअंतर्गत 10 महिने नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द होता. मात्र त्याने कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू केल्याची बाब निदर्शनास आली