Dhule News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आजपासून

Dhule News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आजपासून
Published on
Updated on

पिंपळनेर (ता. साक्री) पुढारी वृत्तसेवा- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे आणि इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे आज, ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. तसेच, नोव्हेंबर २०२३ या महिन्याचा मासिक अहवाल, मासिक बैठका आणि इतर माहिती देण्यावरही अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण बहिष्कार घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या राज्यव्यापी बेमुदत संपाबाबतची कायदेशीर नोटीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे, अशी माहिती समितीच्या वतीने कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

फेब्रुवारी २०२३ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरीव मानधनवाढ, मासिक पेन्शन या आणि इतर मागण्यांसाठी संप केला होता आणि तो केवळ ९ दिवसांत मिटला. त्यावेळेस अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अनुक्रमे रु. १५००, रु. १२५० मानधनवाढ देण्यात आली. ही वाढ ५ वर्षानंतर होत असल्यामुळे वाढत्या महागाईच्या मानाने फारच अल्प होती. परंतु अन्य मागण्याबाबत विचार करून कृती समितीने ती मान्य केली. अंगणवाडी कर्मचारी तेव्हा निराश झाल्या आणि आजही त्या समाधानी नाहीत.

अंगणवाडी कर्मचारी गेली ४८ वर्षे इमाने इतबारे कुपोषणमुक्तीचे काम करत आहेत. ४० वर्षे सातत्याने सरकारदरबारी लढा देऊन महागाईच्या काळात आता कुठे अंगणवाडी सेविकांना दहा हजार, मिनी अंगणवाडी सेविका साडेसात हजार आणि मदतनीसांना साडेपाच हजारापर्यंत पोहोचल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणेच महत्त्वाचे आहे. परंतु, शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सावत्रपणाची वागणूक देत आले आहे, अशी भावना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

इतर विभागातील कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ असा दुजाभाव का? असा प्रश्न त्यांना सतावत आहे, असे सरचिटणीस अंगणवाडी कर्मचारी सभेचे कमलताई परुळेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news