Dhule News | शिरपूर मर्चंट बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संचालक किरण दलाल यांना अटक

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडून सुरु आहे
Money Scam
Money ScamPudhari
Published on
Updated on

धुळे : दि शिरपूर मर्चेंट को-ऑप. बँकेच्या अपहार व आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील संचालक किरण दलाल यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दि. शिरपूर मर्चेंट बँकेचे अधिकारी, कर्मचारी, चेअरमन व कर्जदार असे एकुण ४६ इसमांनी संगनमत करुन बँकेचा व बँकेमधील सभासद व गुंतवणूकदार अशांच्या एकुण १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांचा अपहार व आर्थिक फसवणुक केली आहे. म्हणुन लेखापरीक्षक यांनी अपहार प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ४०३,४०९, ४२०, १२० (ब) सह वाढीव महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Money Scam
Dhule Crime : निकुंभे येथील शेतकरी हत्याकांड: फरार आरोपीला मेहरगावच्या जंगलातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडून सुरु आहे. यागुन्ह्याच्या तपासा दरम्यान अधिक पुराव्यांवरुन बँकेचे तत्कालीन संचालक मंडळामधील संचालक काशीनाथ सोमा महाजन, राजेंद्र शिवप्रसाद पंडीत, तुषार विश्वासराव रंधे, मनोज ओमप्रकाश अग्रवाल, नवनित गिरधारीलाल राखेचा, महेश जयराम लोहार, साहेबराव भिका महाजन, केवलसिंग बाबुराव राजपुत, मुकेश ताराचंद अग्रवाल, किरण यशवंत दलाल, रामचंद्र उखा ठाकरे, विनोद शांतीलाल चावडा, सौ. पुनम राजेश भंडारी, श्रीमती. स्मिता वनीतलाल कोठारी यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न करुन गुन्ह्यात वाढविण्यात आलेली आहेत.

Money Scam
Temple theft भक्ताच्या वेशातील चोरट्याने मारुती मंदिरावर मारला डल्ला; CCTVच्या आधारे २४ तासांत आवळल्या मुसक्या

त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरु असताना गुन्ह्यातील आरोपी किरण यशवंत दलाल हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याचा गुन्हयात सहभाग दिसत असल्याने या आरोपीस अटक करुन न्यायालया समोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल देवढे, पोउनि सविता गवांदे, पोलीस अंमलदार रविंद्र माळी, गणेश खैरनार, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, विलास पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news