Dhule News : सवलत कर्ज वाटप कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हाधिकारी अभिनव गोयल
जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील 1 लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप बुधवार, 13 मार्च, 2024 रोजी रोजी दुपारी 4.00 करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदीर, पारोळा रोड, धुळे येथे सवलत कर्ज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजित तांबे, जयकुमार रावल, काशिराम पावरा, कुणाल पाटील, मंजुळा गावित, फारुख शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, धुळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, धुळे, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, धुळे इत्यादी मार्फत कर्ज वितरीत केलेल्या तसेच महानगरपालिका क्षेत्रातील विविध केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत लाभ दिलेले लाभार्थी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी, नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news