Dhule News | घोटभर पाण्यासाठी वणवण! संतप्त महिलांचा सामोडे चौफुलीवर रास्ता रोको

Dhule News | घोटभर पाण्यासाठी वणवण! संतप्त महिलांचा सामोडे चौफुलीवर रास्ता रोको
Published on
Updated on

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा – साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील नवापूर रोड, टेंभा रोड, घोड्यामाळ, पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. त्यामुळे आज संतप्त महिलांनी भर उन्हात नवापूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले.

सामोडे, घोड्यामाळ व टेंभा रोड भागात आठ दिवसाआड पाणी येत आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. कुठेतरी एक दोन दिवसात एक किंवा दोन टँकरने पाणी ठराविक परिसरात येते. त्यामुळे मोठी गर्दी होवून टँकरवर पाणी भरण्यासाठी महिला व पुरुषांमध्ये वाद ,मारहाणीचे प्रकार पहावयास मिळत आहेत. त्यामुळे आज या परिसरातील महिला व नागरिकांनी नवापूर रस्त्यावर पार्वती हॉस्पिटल समोर रास्तारोको केला. आंदोलनाची माहिती कळताच पोलीस पथकासह दाखल झाले. मात्र संतप्त महिला ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या. यावेळी स्थानिक महिला सदस्या देखील आल्या. त्यांचेही जनता ऐकायला तयार नव्हत्या. त्या म्हणाल्या आम्ही घोड्यमाळ परिसरातील पाण्याच्या समस्या मांडल्या आहेत. या परिसरात पाच ग्रा.पं सदस्य निवडून जातात व सामोरे पंचायतीवर सर्वात जास्त महसूल हा याच भागातुन जमा होतो. परंतू पंचायत गांभीर्य़ाने विचार करत नाही. यावेळी संतप्त नागरिकांनी आमचा भाग हा पिंपळनेर नगरपरिषदेला जोडून देण्याचीही मागणी केली. दूरध्वनीवरून पोलिसांनी जि.प सदस्य दीपक भारुडे, सरपंच आरती भारुडे तसेच ग्रामसेवक लाडे यांच्याशीही बोलणे केले. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही रास्तारोको मागे घेणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला. यावेळी उपसरपंच सचिन शिंदे यांनी समस्या ऐकून घेतल्या. सायंकाळपर्यंत नवीन पाईप टाकून पाण्याची व्यवस्था करून देतो, आपण नवीन एक विहीरही अधिग्रहित केली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल असे आश्वासन दिले. त्यांनी लागलीच ठेकेदाराला व वॉटरमनला घटनास्थळी बोलावुन कामाला सुरुवात करण्यास सांगुन तसेच पाण्याच्या टँकरचीही वाढ करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी या जागेवरून आपला मोर्चा हटवला. मात्र सायंकाळपर्यंत पाणी न आल्यास पुन्हा उद्या रास्तारोको करु,असा इशाराही महिलांनी दिला.

यावेळी डॉ.यतिष घरटे, शिवसेनेचे अभय शिंदे,सा. कार्यकर्ते राजेंद्र घरटे, पीएसआय चौरे व पोलिसांनीही मार्ग काढण्यासाठी सहकार्य केले. मात्र टेंभारोड,सामोडे घोड्यामाळ,पोलीस स्टेशन परिसरात व नवापूर रोड परिसरातील सामोडे ग्रामपंचायतने पाण्याची समस्या कायमची मिटवावी, अशी मागणीही यावेळी महिलांनी व नागरिकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news