

पिंपळनेर: जि.धुळे पुढारी वृत्तसेवा- शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या उपक्रमा अंतर्गत साक्री तालुक्यातील पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणे या विद्यालयास माध्यमिक गटात तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या शुभ हस्ते राज्य शासनाकडून विद्यालयास 2,00000 रुपयाचा धनादेश प्राप्त झाला. त्याच बरोबर स्मृती चिन्ह व अभिनंदन पत्र मिळाले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन आर.एन.शिंदे, स्कूल कमिटी चेअरमन सुभाष शेठ, जैन संचालक आर.पी.भामरे, केंद्रप्रमुख वा.रा.सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.व्ही.भामरे, विद्यालयाचे शिक्षक व्ही.ए.दहिते,एस.बी.राणे,डी.एस.जैन,के.आर.कोळी डी.बी.अहिरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.