Dhule News | सभापती बाजीराव पाटील यांच्या पॅनलची बाजी

चिंचखेडा सेवा सह. सोसायटीत सर्व जागांवर दणदणीत विजय
Chinchkheda Society Election Results
चिंचखेडा सेवा सह.सोसायटीत सभापती बाजीराव पाटील यांचा पॅनल विजयी झाला.(छाया : यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे पुढारी वृत्तसेवा : चिंचखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलने सर्व जागांवर दणदणीत मतांनी विजय मिळवित विरोधी पॅनलच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.

Chinchkheda Society Election Results
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 12 मतदान केंद्र 
Summary
  • विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच घेण्यात आली.

  • त्यात धुळे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलने बाजी मारली.

  • शेतकरी पॅनलच्या सर्व जागा दिडशेच्या मताधिक्क्याने विजयी झाल्या.

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत धुळे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलने सर्व जागांवर दिडशेच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय मिळविला.

न्यायालयाने त्या संचालकांनाही बिनविरोध केले घोषित

उमेदवारी अर्ज माघारीनंतर बाजीराव हिरामण पाटील, छोटू हिरामण पारधी, देविदास शिवाजी कोळेकर यांची सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांविरुध्द विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही त्या संचालकांना बिनविरोध घोषीत केले. तर उर्वरीत सर्व जागांवरही सभापती बाजीराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळविला.

Chinchkheda Society Election Results
Nashik News | विद्यार्थीनीचा वर्गातच मृत्यू, नाशिकमधील घटनेने खळबळ

हे उमेदवार आले निवडून

त्यात संजय निंबाजी देसले, बापू रामभाऊ देसले, पंडीत भादू देसले, इंदुबाई गोरख देसले, बापूराव उत्तमराव गायकवाड, काशिनाथ चिंतामण मराठे, सुनिल दौलतराव मराठे, रोहिदास विठ्ठल पाटील, जिजाबाई बहिरु मोरे, मंगलाबाई सुदाम पवार हे उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने संचालक म्हणून विजयी झाले. निवडून आलेल्या उमेदवारांचा माजी मंत्री रोहिदास पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या निवडणूकित निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरसाठ यांनी कामकाज पाहिले तर त्यांना सचिव आबा मोरे यांनी सहकार्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news