धुळे : शिरपूरमध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; मिळून आलेली शेती वनविभागाची?

सांगवी परिसरात गांजाची शेती; पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात
शिरपूर, धुळे
शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती आढळली.(धुळे : यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य म्होरक्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये लाकड्या हनुमान तसेच अन्य परिसरातून गांजाची शेती यापूर्वी देखील पोलीस दलाने उध्वस्त केली आहे. आज देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणावर गांजाचे पीक घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तातडीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली .त्यानुसार पोलीस अधीक्षकांसह पोलीस पथकाने या ठिकाणी शेतात छापा मारला. यावेळी त्यांना गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती होत असल्याचा प्रकार दिसून आला. पोलीस दलाने शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे सुरज कालूसिंग पावरा, रोहित सुभाराव पावरा, समीर बळीराम पावरा, रसलाल हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतले आहे.

शिरपूर तालुक्यात यापूर्वी देखील गांजाची शेती सापडली असून यातील बहुसंख्य प्रकरणांमध्ये वन जमिनीवर अशा प्रकारे पीक घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात पोलीस दलाने यापूर्वीच वनविभागाला देखील अशा प्रकारची सूचना दिली होती. मात्र वन विभागाने या संदर्भात अद्यापही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे दिसून येते आहे.

येथील स्थानिक शेतात गांजाचे मोठ्या प्रमाणावर पीक सापडले असून आता या पिकाचे वजन खात्री केली जाणार आहे. त्याचप्रमाणे गांजाचे पीक कुणाच्या सांगण्यानुसार लावले, तसेच गांजाची तस्करी कोणाच्या सूचनेनुसार होणार होती, याविषयीचा सविस्तर तपास आता केला जाणार आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे

गांजा पिक मिळून आलेली शेती वनविभागाची?

विशेष म्हणजे आज बुधवार (दि.25) रोजी ज्या शेतात गांजा पिक मिळून आले आहे. ही वनविभागाची असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news