Dhule Municipal Corporation | धुळे मनपातील १३६ बदली सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय

उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा कंदील
Dhule  Sanitation Workers Permanent
१३६ बदली सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याच्या निर्णयाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा कंदील Pudhai
Published on
Updated on

Dhule Sanitation Workers Permanent

धुळे : धुळे महापालिकेत गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून बदली सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या १३६ कर्मचाऱ्यांना मंजूर व रिक्त पदांवर कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामगारांच्या कायम सेवेत समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकरणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी बदली सफाई कामगारांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अग्रवाल यांनी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करून या कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून सेवेत सामावून घेण्याची विनंती केली.

Dhule  Sanitation Workers Permanent
Drugs Seized Dhule | मध्यप्रदेशातून भांगच्या गोळ्यांची तस्करी ; मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

बहुतांश कामगारांनी वयोमर्यादा ओलांडली असल्याने त्यांच्या दीर्घ सेवेचा विचार करून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आस्थापना खर्चासंबंधीच्या अटींमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात आली होती.

मुंबईत आमदार अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री शिंदे तसेच नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन १३६ कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. शिंदे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आणि मंजूर व रिक्त पदांवर या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

Dhule  Sanitation Workers Permanent
Dhule Crime | शिरपूर मधील सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या मालेगाव मधील बुरखा गॅंगला अटक

या निर्णयाबद्दल आमदार अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. अनेक वर्षांपासून कायम सेवेची प्रतीक्षा करणाऱ्या १३६ सफाई कामगारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news