Drugs Seized Dhule | मध्यप्रदेशातून भांगच्या गोळ्यांची तस्करी ; मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

कंटेनर चालकासह उत्पादक कंपनीचा मालक व खरेदीदाराविरुद्ध गुन्हा
Dhule Songir Toll Plaza Bhang Pills Smuggling
Dhule Songir Toll Plaza Bhang Pills SmugglingPudhari
Published on
Updated on

Dhule Songir Toll Plaza Bhang Pills Smuggling

धुळे : आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या भांगच्या गोळ्यांची मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात तस्करी होत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणला. मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ कारवाई करत पोलिसांनी कंटेनरसह सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कंटेनर चालक, इंदूर येथील संबंधित कंपनीचा मालक आणि अहिल्यानगर येथील खरेदीदाराविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना इंदूरहून येणाऱ्या एमपी-०९/जीजी-३१९९ क्रमांकाच्या कंटेनरमधून भांगच्या गोळ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक ढोके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार सतीश जाधव, राहुल सानप, आरिफ पठाण, शिरीष भदाणे आणि सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने सोनगीर टोलनाक्याजवळ सापळा रचला.

Dhule Songir Toll Plaza Bhang Pills Smuggling
Dhule Crime | शिरपूर मधील सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या मालेगाव मधील बुरखा गॅंगला अटक

यावेळी इंदूरच्या दिशेने येणारा संशयित कंटेनर अडवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव मोहम्मद साबीर मुशरफ खान (रा. पवनपुरी, पालदा, इंदूर) असल्याचे सांगितले. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता पाच प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये ठेवलेल्या दहा कागदी खोक्यांत एकूण २०० डबे आढळून आले. या डब्यांमध्ये ‘सनन पाचक वटी’ नावाच्या गोळ्या असून, प्रत्येक डब्यात सुमारे ८७५ ग्रॅम मादक पदार्थ भांग असल्याचे आढळले. या साठ्याची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या तपासात या गोळ्या तयार करणाऱ्या उत्पादकाने संगनमत करून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने भांगच्या गोळ्यांच्या डब्यांवर ‘आयुर्वेदिक चूर्ण गोळी’, ‘पाचक वटी’, ‘चूर्ण गोळी’ अशा स्वरूपाचे लेबल लावल्याचे समोर आले. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करून बनावट लेबलच्या माध्यमातून मादक पदार्थाची वाहतूक व विक्री केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Dhule Songir Toll Plaza Bhang Pills Smuggling
Loan Waiver Dhule | धुळे जिल्ह्यातील ९ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ: पालकमंत्री जयकुमार रावल

या प्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद साबीर मुशरफ खान, इंदूर येथील मेहता आयुर्वेदिक संस्थान, सनन हाऊसचे मालक तसेच अहिल्यानगर येथील खरेदीदार इरफान मकबुल शेख यांच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news