Dhule Census 2026 | धुळेकरांनो, घरबसल्या करा 'स्वगणना'; महापालिकेकडून 'डिजिटल जनगणने'चे आवाहन

१ ते १५ मे दरम्यान संधी,३३ प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवा SEID क्रमांक
Dhule Census 2026 update
Dhule Census 2026 update(AI Photo)
Published on
Updated on

Dhule Municipal Corporation census news

धुळे : भारत सरकारच्या आगामी जनगणनेसाठी धुळे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, यंदा प्रथमच नागरिकांना आपली माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक 'स्वगणना' पोर्टलचा वापर करून आपली नोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रक्रियेत डिजिटल क्रांती

कोरोनामुळे लांबणीवर पडलेली ही जनगणना यंदा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत आहे. नागरिकांचा वेळ वाचवा आणि माहिती अधिक अचूक असावी, यासाठी केंद्र सरकारने स्वगणनेचे पोर्टल विकसित केले आहे. धुळे शहर व परिसरात १६ मे पासून प्रगणक घरोघरी येणार असले, तरी त्याआधी नागरिक स्वतःहून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Dhule Census 2026 update
Dhule News : धुळे जिल्ह्यासाठी 'मुख्यमंत्री सहायता निधी' ठरतोय देवदूत; २५२ रुग्णांना २.१९ कोटींची मदत!

अशी करा 'स्वगणना' (स्टेप बाय स्टेप)

संकेतस्थळ: सर्वप्रथम se.census.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

नोंदणी: आपला मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपी (OTP) द्वारे लॉगिन करा.

माहिती भरणे: कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि घराशी संबंधित एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक भरा.

सबमिट: माहिती पूर्ण भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

SEID क्रमांक: फॉर्म सबमिट होताच तुमच्या मोबाईलवर किंवा ई-मेलवर एक SEID (Self Enumeration ID) क्रमांक प्राप्त होईल.

प्रगणक आल्यावर काय करावे

जेव्हा १६ मे ते १४ जून दरम्यान महानगरपालिकेचे प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा तुम्हाला पुन्हा सर्व माहिती सांगण्याची गरज पडणार नाही. तुम्ही केवळ तुमचा SEID क्रमांक त्यांना दाखवल्यास, तुमची जनगणना प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल. यामुळे प्रगणकांचा आणि तुमचाही वेळ वाचणार आहे.

Dhule Census 2026 update
Dhule District Jail | धुळे जिल्हा कारागृहात न्यायबंदीच्या कुटुंबियांसाठी कायदेविषयक मदत कक्ष सुरू

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

धुळे महानगरपालिकेने या मोहिमेसाठी ७४७ प्रगणक आणि १२५ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून, त्यांना डिजिटल प्रणाली हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी नितीन कापडणीस स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

धुळेकरांसाठी महत्त्वाचे

"जनगणना हा देशाच्या विकासाचा आणि नियोजनाचा पाया आहे. शहराच्या भविष्यकालीन गरजा लक्षात घेता, प्रत्येकाने आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. डिजिटल इंडियाचा भाग म्हणून नागरिकांनी स्वगणनेला प्राधान्य द्यावे."असे आवाहन धुळे महानगरपालिका मार्फत करण्यात आलेले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news