Dhule Municipal Corporation | धुळे मनपा हद्दवाढीतील ११ गावांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

MLA Ram Bhadane | आमदार राम भदाणे यांची माहिती
Dhule  Land Record Property Cards
Dhule Land Record Property Cards Pudhari
Published on
Updated on

Dhule Land Record Property Cards

धुळे : धुळे महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या ११ महसुली गावांमध्ये सिटी सर्व्हे लागू करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी दिली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर यश मिळाले आहे.

मनपा हद्दवाढीनंतर नागरिकांकडून पाणीपट्टी आणि घरपट्टी आकारली जात होती. मात्र, अधिकृत ‘सीटीएस’ क्रमांक नसल्याने नागरिकांना बँक कर्जासह विविध शासकीय सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत विशेष बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत मनपा हद्दवाढीतील गावांचे पुनर्सर्वेक्षण करून त्यांना ‘सीटीएस’ क्रमांक देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शासनाने मिळकत पत्रिका देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

Dhule  Land Record Property Cards
Dhule Municipal Corporation | महासभेत १५० कोटींच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी; एमआयएमचा पाठिंबा, शिवसेना-राष्ट्रवादीचा सभात्याग

आमदार भदाणे यांनी सांगितले की, या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रांताधिकारी रोहन कुवर यांच्यासह विविध अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत धुळे ग्रामीणमधील ९० गावांसह मनपा हद्दवाढीतील ११ गावांच्या मिळकत पत्रिकेचा मुद्दा मांडण्यात आला होता. महसूल मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत अवघ्या दोन आठवड्यांत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये नगर भूमापन योजना लागू करून सातबारा उतारे बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव सादर करायचा असून, आवश्यक निधी जिल्हा वार्षिक निधी किंवा नगरउत्थान योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Dhule  Land Record Property Cards
Dhule Laling Ghat Accident | लळींग घाटातील भीषण तिहेरी अपघात; मृत डंपर व बस चालकावर गुन्हा दाखल

या निर्णयामुळे धुळे मनपा हद्दवाढीतील धुळे तालुक्यातील बोरीस, लामकानी, बुरझड, शिरदाने, मेहरगाव, चिंचवड, निकुंभे, ढंडाणे, वडेल, तिसगाव, बोरकुंड, शिरूर, निमगुळ, विंचुर, जुनवणे, वेल्हाणे, मोघण, पुरमेपाडा, हेंद्रुण, आर्वी, धामणगाव, गोंदूर, वार, निमडाळे, चितोड, जळगाव, बिलाडी, मोराणे, अवधान, रानमळा, सावळदे, हेंकळवाडी, उडाणे, गाडउतार, नगाव, नंदाणे, दापुरे, दापुरी, कापडणे, तामसवाडी, सोनगीर, खेडे, चौगाव, नेर, कुसुंबा, गोताणे, चौगाव, देऊर, नांद्रे, फागणे, मुकटी, अजंग, सौंदाणे, चिंचखेडे, वरखेडे, वडजाई, मोहाडी प्र.डांगरी, काळखेडे आदी गावांना देखील येणाऱ्या काळात हा लाभ मिळणार आहे.

“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष घालून हा महत्त्वाचा प्रश्न सोडविला. शासन निर्णयामुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्कासह कर्जसुविधांचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच धुळे ग्रामीणमधील इतर गावांचाही प्रश्न मार्गी लागेल.

- आमदार राम भदाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news