Dhule Mayor Mayadevi Pardeshi | धुळ्यात खळबळ : महापौर मायादेवी परदेशी यांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक पोस्टमुळे व्यथित; खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू, प्रकृती स्थिर
Dhule Mayor Mayadevi Pardeshi
Dhule Mayor Mayadevi PardeshiPudhari
Published on: 
Updated on: 

Dhule Municipal Corporation News

धुळे : धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद आणि बदनामीकारक पोस्टमुळे त्या व्यथित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील पोस्टवरून वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोरक्षक संजय शर्मा यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महापौर परदेशी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून संजय शर्मा यांना अटक केली आहे.

Dhule Mayor Mayadevi Pardeshi
Dhule Protest | धुळ्यात महापौर मायादेवी परदेशी यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा

दरम्यान, या कथित बदनामीकारक पोस्टमुळे मानसिक त्रास झाल्याने महापौर परदेशी यांनी विष प्राशन केल्याची बाब समोर आली. ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन केल्याच्या घटनेला आमदार अनुप अग्रवाल यांनीही दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे धुळे शहरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.