Dhule Mayor Election | धुळे महापौरपदासाठी भाजपकडून मायादेवी परदेशी, विकास आघाडीकडून गीता नवले, एमआयएमकडून हसीना बानो यांचे अर्ज दाखल

Dhule Politics | धुळे महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरपद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित
Dhule Municipal Corporation
धुळे महापौरपदासाठी भाजपकडून मायादेवी परदेशी यांना उमेदवारी Pudhari
Published on
Updated on

Dhule Municipal Corporation

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून मायादेवी महादेव परदेशी, शहर विकास आघाडीकडून गीता तुषार नवले, तर एमआयएमकडून हसीना बानो साजिद अली यांनी उमेदवारी दाखल केली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील, शहर विकास आघाडीकडून इरफान फजलू अन्सारी, तर एमआयएमकडून आमिर असलम पठाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

धुळे महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरपद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी विरोधी गटांकडून ‘चमत्कार घडेल’ असा दावा करण्यात येत आहे.

Dhule Municipal Corporation
Solapur Dhule highway accident : सोलापूर-धुळे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला ठार

धुळे महापालिकेच्या ७४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माघारीनंतर भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले. उर्वरित ७० जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपला ५०, एमआयएमला १०, शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ८, तर १ अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. या संख्याबळावर महापौरपद भाजपकडे जाणे स्पष्ट होते. मात्र भाजपमध्ये महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याने नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पत्रान्वये या सस्पेन्सवर पडदा पडला. पक्ष निरीक्षक म्हणून विजय साने धुळ्यात दाखल झाले. यावेळी धुळे महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते. याच बैठकीत महापौरपदासाठी सौ. मायादेवी महादेव परदेशी व उपमहापौरपदासाठी सौ. ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर दोन्ही उमेदवारांसह गटनेत्या किरणताई कुलेवार, प्रतोद भगवान गवळी यांचे अभिनंदन करण्यात आले.

Dhule Municipal Corporation
Dhule Unseasonal rain | शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात गारपिटीमुळे फळबागा- पिकांचे मोठे नुकसान

महापौर व उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीने मायादेवी परदेशी व ज्योत्स्ना पाटील यांनी आपले अर्ज मनपा सचिवांकडे सादर केले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, गटनेत्या किरणताई कुलेवार, राज्य सचिव डॉ. सुशील महाजन, माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना महाले आदी उपस्थित होते.

विरोधी गटाकडून शिवसेना-राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीने महापौरपदासाठी गीता तुषार नवले व उपमहापौरपदासाठी इरफान फजलू अन्सारी यांचे नामांकन दाखल केले आहे. स्वतंत्र गट नोंदणीमुळे या आघाडीचे संख्याबळ १३ आहे. एमआयएमनेही महापौरपदासाठी हसीना बानो साजिद अली व उपमहापौरपदासाठी आमिर असलम पठाण यांचे अर्ज दाखल केले आहेत. एमआयएमचे १० नगरसेवक निवडून आले आहेत.

Dhule Municipal Corporation
Dhule Success Story | सलून दुकानात काम करत मिळवली पीएच.डी. : साक्रीचा सलून दुकानदाराचा मुलगा होणार 'एनआयटी'मध्ये शास्त्रज्ञ

दावे-प्रतिदावे

महापौर व उपमहापौर निवडीसाठी ६ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारी दाखल झाल्यानंतर दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी ‘विशेष सभेत चमत्कार घडेल’ असा दावा केला आहे. आमची रणनीती तयार असून काही नगरसेवक संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे एमआयएमचे जावेद बिल्डर यांनीही महापौरपदावर दावा केला आहे. संख्याबळ नसले तरी ऐनवेळी काहीही घडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एमआयएमवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी आमदार फारुख शाह यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत टीकाकारांवर टोला लगावला.

Dhule Municipal Corporation
Dhule Crime | गुटखा तस्करीसाठी दीड कोटीच्या अत्याधुनिक आरामबसचा वापर : बस मध्यप्रदेशातील, तिघांना अटक

शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने एमआयएम भाजपच्या आमदार अनुप अग्रवाल यांच्या इशाऱ्यावर उमेदवारी देत असल्याचा आरोप केला. यावर आमदार अनुप अग्रवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, “माझ्या शब्दावर एमआयएम उमेदवारी देत असेल, तर शिवसेना-राष्ट्रवादीनेही माझ्या शब्दावर उमेदवारी मागे घ्यावी,” असा पलटवार केला. आरोप करणाऱ्यांना महापौरपद तर सोडाच, विरोधी पक्षनेतेपद मिळवणेही कठीण जाईल, असा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news