Dhule Lok Sabha Live Update : धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.92 टक्के मतदान

Dhule Lok Sabha Live Update : धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.92 टक्के मतदान

धुळे पुढारी वृत्तसेवा – धुळे लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सोमवार (दि.20) रोजी सकाळी 7 वाजेपासूनच मतदारांनी मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 6.92 टक्के मतदान झाले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी अशी….
धुळे शहर – 5.84 टक्के,
धुळे ग्रामीण – 7.86 टक्के,
शिंदखेडा -5.87 टक्के,
मालेगांव मध्य – 9.00 टक्के,
मालेगांव बाहृय – 5.00 टक्के,
बागलाण – 8.38 टक्के

धुळे – पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सोमवार (दि.20) रोजी सकाळी 7 वाजेपासूनच मतदारांनी मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. (छाया : यशवंत हरणे)
धुळे – पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सोमवार (दि.20) रोजी सकाळी 7 वाजेपासूनच मतदारांनी मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. (छाया : यशवंत हरणे)

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज सोमवार (दि.20) रोजी सकाळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक मतदान केले. लोकशाहीच्या या महा कुंभात प्रत्येकाने मतदान करून सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. तर सकाळच्या सत्रात धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news