Dhule Lok Sabha : अत्यावश्यक सेवेतील 407 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Dhule Lok Sabha : अत्यावश्यक सेवेतील 407 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

धुळे : पुढारी  वृत्तसेवा-  धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजला लगतची उजवीकडील खोली क्रमांक 1 (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे टपाली मतदान कक्ष (पोस्टल वोटींग सेंटर) स्थापन करण्यात आला होता. याठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभरात 407 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल अधिकारी संदीप पाटील यांनी दिली आहे.

ही सुविधा कशासाठी?

  • अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा
  • ते मतदानापासून वंचित राहु नये
  • आज दिवसभरात 407 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत सुविधा

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा, यासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला लगतची उजवीकडील खोली क्रमांक 1 (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे दिनांक 14 ते 16 मे, 2024 या कालावधीत सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

इतक्या जणांनी केली नोंदणी

धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील 1091 तर 8 इतर जिल्ह्यातील असे एकूण 1099 अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. यापैकी मंगळवार, दि. 14 मे रोजी 209 तर आज 15 मे रोजी 407 अशा एकूण 616 अत्यावश्यक सेवेतील उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.  उर्वरित मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news