धुळे : राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिपॅडची पाहणी

धुळे : राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिपॅडची पाहणी

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा– बारिपाडा (ता.साक्री) येथे येत्या 21 नोव्हेंबरला राज्यपाल रमेश बैस येणार आहेत. बारिपाडा येथे जिल्हा व तालुक्यातील सर्व अधिकारी व वन समितीच्या सदस्यांची बैठक झाली. बारीपाडा येथील नियोजित दौऱ्यात जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पिंपळनेरचे सपोनी श्रीकृष्ण पारधी, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, तालुका व जिल्हास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी हेलीपॅडची जागेची, जंगलाची पहाणी तसेच ज्या ठिकाणी मंडप करावयाचे त्या ठिकाणाची पाहणी केली.

कृषी सहाय्यक सर्जेराव आकलाडे तसेच तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी हेलिपॅड, कार्यक्रम नियोजित स्थळ, वनदर्शन स्थळ, स्टॉल नियोजनाबाबत पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news