Dhule Cricket Team | 16 वर्षाखालील धुळे जिल्हा क्रिकेट संघ जाहीर, कर्णधारपदी शिरपूर येथील पनव अग्रवाल

उपकर्णधार पदी धुळयाचा देवेन वाघ
Panav Agrawal captain Dhule cricket
U16 cricket team announcement 2026Pudhari
Published on
Updated on

Panav Agrawal captain Dhule cricket

धुळे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे १७ ते ३० एप्रिल दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या १६ वर्षाखालील आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी धुळे जिल्हा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी शिरपूरच्या पनव अग्रवाल तर उपकर्णधारपदी धुळेच्या देवेन वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी गरुड कॉम्प्लेक्समधील जिल्हा क्रिकेट असोसिएशन कार्यालयात समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी खजिनदार विक्रम राठोड यांच्या हस्ते निवड झालेल्या खेळाडूंना ड्रेसचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला निवड समितीचे चेअरमन प्रकाश पाटील, सदस्य ॲड. कुंदन पवार, अरविंद किल्लेदार, नरेंद्र काळमेख, दबीर शेख, संजय जगताप, प्रा. सतीश मराठे, लहू पाटील (ज्युनिअर) तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

Panav Agrawal captain Dhule cricket
Dhule news | मध्यवर्ती बसस्थानकासाठी कृती समितीचे खासदार आणि माजी आमदारांना निवेदन

या स्पर्धेत धुळे जिल्ह्याचा समावेश ‘आय’ गटात करण्यात आला असून, विजय क्रिकेट क्लब पुणे, झोराष्ट्रीयन क्रिकेट क्लब पुणे, क्वालिफायर पुणे, तसेच हिंगोली व सांगली जिल्हा संघांशी धुळेचा सामना होणार आहे. साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत धुळे संघाचे सामने अनुक्रमे १७-१८ एप्रिल (विजय क्रिकेट क्लब, पुणे), २०-२१ एप्रिल (सांगली), २३-२४ एप्रिल (हिंगोली), २६-२७ एप्रिल (झोराष्ट्रीयन क्रिकेट क्लब, पुणे) आणि २९-३० एप्रिल (क्वालिफायर, पुणे) असे होतील.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघाची निवड केली जाणार असून, हा संघ बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणार आहे.

धुळे जिल्हा संघात पनव कमलेश अग्रवाल (कर्णधार), देवेन विजय वाघ (उपकर्णधार), तेज पाटील, अनिकेत माळी, जिग्नेश जाधव, ओम पाटील, नैतिक चौधरी (शिरपूर), तसेच रोनित आरुजा, सोहम चौधरी, सौरव वाघमारे, प्रथमेश गांगुर्डे, राम बाविस्कर (धुळे), सिद्धांत पाटील (साक्री) यांचा समावेश आहे. राखीव खेळाडूंमध्ये जयहंस गिरासे (दोंडाईचा), सुदर्शन पाटील (शिरपूर), सार्थक पाटील व फैजान शेख (धुळे) यांचा समावेश आहे. उत्तर विभागासाठी निळ खळगे, रुद्र कानडे आणि वेदांत अमृतकर यांची निवड करण्यात आली आहे.

Panav Agrawal captain Dhule cricket
Dhule Temperature | धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठला; नागरिक घामाघूम

संघासोबत मुख्य प्रशिक्षक फिरोज शेख व सहाय्यक प्रशिक्षक आनंद जगताप मार्गदर्शन करणार आहेत. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news