Dhule crime | धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह २१ वर्षीय आरोपीस अटक

भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Dhule crime | धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह २१ वर्षीय आरोपीस अटक
Published on
Updated on

धुळे : जिल्ह्यातील सोनगीर येथे बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून 41हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. मुकेश परशुराम पावरा (वय 21 रा. सुभानपाडा, बोरपाणी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जून,शुक्रवार रोजी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एक इसम सोनगीर येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्विस रोडवर बसस्टँडजवळ देशी बनावटीचा गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

Dhule crime | धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह २१ वर्षीय आरोपीस अटक
Chandrapur Crime | धोपटाळा कॉलनीतील महिलेच्या खून प्रकरणाचा छडा; तेलंगणातून आरोपी जेरबंद

स्थानिक गुुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, पो. कॉ. आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर यांच्या पथकाने सोनगीर बसस्टँड आणि उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळील सर्विस रोडची पाहणी करत असताना, शिरपूरकडून धुळे बाजूकडे जाणाऱ्या बस थांब्याजवळ एक संशयित युवक उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव मुकेश पावरा असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला पॅन्टच्या आत चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल (मॅगझिनसह) आणि पॅन्टच्या उजव्या खिशात एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल आढळून आला.

Dhule crime | धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह २१ वर्षीय आरोपीस अटक
Jalgaon Crime | दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक; २ जण पळाले

पोलिसांनी या शस्त्राबाबत परवान्याची विचारपूस केली असता, आरोपीकडे कोणताही वैध परवाना मिळून आला नाही. सदर शस्त्र आरोपीने मध्य प्रदेशातील उमर्टी येथून आणल्याच्या पोलिसांना संशय आहे.याप्रकरणी पोलीस अंमलदार आरिफ रमजान पठाण यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news