Dhule crime : साक्रीत अफीम सदृश (दोडा) अंमली पदार्थांचा साठा जप्त, दोघांना अटक

दरम्यान हा अमली पदार्थ नेमका साक्री शहरात कोठून आला याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

धुळे : साक्री शहरातील एका घरातून सुमारे 12 लाख 33 हजार 960 रुपये किमतीचा 80 किलो वजनाचा दोडा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हा अमली पदार्थ नेमका साक्री शहरात कोठून आला याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

Crime News
Dhule Illegal Drug Seized | गुजरातमधून गुंगीकारक औषधांची तस्करी; 410 बाटल्या जप्त, तिघे जेरबंद

साक्री शहरातील सुयोग कॉलनी परिसरातील सावता नगरा मधील एका घरामध्ये अमली पदार्थाचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने या घरात छापा टाकला असता त्यांना अफीम सदृश दोडा हा अमली पदार्थ आढळून आला. या कारवाई मध्ये पोलिसांनी सुमारे 80 किलो वजनाचा हा अमली पदार्थ जप्त केला असून त्याची किंमत 12 लाख 33 हजार 960 रुपये असल्याचे सांगितले जाते आहे. या संदर्भात आता परिविक्षाधीन उपनिरीक्षक राहुल बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकेश गोवर्धन दास बिश्नोई, भरत भिकाराम बिश्नोई तसेच राजस्थान राज्यातील सुरेश नामक व्यक्ती या तिघांच्या विरोधात गुंगीकारक औषधांच्या प्रतिबंध कायदा कलम 8( क), 15( क), 19 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Drug Crackdown Maharashtra: अमली पदार्थविरोधात चार महिन्यांत बाराशे गुन्हे; २५४ कोटी किमतीचा साठा जप्त

दरम्यान पोलिसांनी कारवाई केलेले घर हे कुवर नामक व्यक्तीच्या नावे असून हे घर बिश्नोई यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. त्याचप्रमाणे भरत भिकाराम बिश्नोई यांचा हॉटेल व्यवसाय असून या हॉटेलच्या माध्यमातून अमली पदार्थाची अशाप्रकारे तस्करी करण्यात येत असल्याचा अंदाज पोलीस तपासून पाहत आहे. हा अमली पदार्थाचा साठा नेमका कोठून साक्रीमध्ये आला, याचा तपास सुरू करण्यात आला असून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या मुख्य म्होरक्यापर्यंत पोहोचण्याची तयारी पोलीस पथकाने सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news