Dhule Crime | तांब्याची तार विक्री करण्याच्या बहाण्याने 24 लाखांची लूट, तिघांच्या आवळल्या मुसक्या

Dhule Crime | तांब्याची तार विक्री करण्याच्या बहाण्याने 24 लाखांची लूट, तिघांच्या आवळल्या मुसक्या
Published on
Updated on

धुळे पुढारी वृत्तसेवा- तांब्याची तार विकत घेण्याच्या बहाण्याने मुंबई येथील व्यापाऱ्यांना साक्री तालुक्यातील पेटले येथे बोलावून त्यांची लुटमार करणाऱ्या टोळक्याला अवघ्या काही तासात गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून सुमारे 13 लाख ५० हजार रुपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे.

साक्री तालुक्यातील पेटले परिसरात ही घटना घडली असून यापूर्वी देखील येथील ठगांनी अनेकांना गंडा घालण्याच्या घटना घडल्या आहे. त्यासाठी सर्रासपणे फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर अशा टोळीकडून केला जातो. आता या भामट्यांनी मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला. आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून ती तुम्हाला निम्मे किमतीत देवू असे आमिष दाखविले. त्यानुसार ४४ टन कॉपर वायर २ कोटी ४४ लाख रुपयांत देण्याचे ठरले. त्यासाठी ठगांनी २२ ते २३ लाखांची आगाऊ रक्कमेची मागणी केली. या व्यवहारासाठी मुंबई येथील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मालक हरिष सुजेश पवार, मॅनेजर सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर व त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकूमसिंग प्रकाशसिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा हे दोन चारचाकी वाहनांनी पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टावरजवळ आले. सुझलॉन कंपनीच्या गेटवर इक्बाल चव्हाण रा. जामदा, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश येंकी पवार, राजेश शंकीलाल पवार व अन्य दोन-तीन जण त्यांची वाट पहात उभे होते. या भामट्यांनी मुंबई येथील या व्यापाऱ्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान मुंबईतील व्यापाऱ्यांच्या अंगावरील दागिने तसेच त्यांच्याकडील रोकड हिसकावून घेण्यात आली. मारहाण करुन हरिष पवार यांच्या ताब्यातून २२ लाख ३ हजारांची रोकड, २ लाख ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असे एकुण २४ लाख ५८ हजार रुपयांचा किमतीचा मुददेमाल त्यांना मारहाण व दमदाटी करुन बळजबरीने लुटुन नेला.

निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यासंदर्भात निजामपुर पोलीस ठाण्यात हरीष पवार यांच्या तक्रारीवरुन भादवि कलम ३९५,१२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गंभीर प्रकार घडल्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी देखील निजामपूर गाठून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना तपासासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर सपोनि हनुमान गायकवाड, असई शेख, पोहेकाँ मालचे, पोना आखाडे, पोकॉ अहिरे, पोकॉ चव्हाण, पोकॉ शिंदे, चालक असई पवार या पथकाने अमीत तानाजी नाईक रा. ऐरोली नवी मुंबई , अनुप ऊर्फ राज मुन्नालाल शर्मा रा.उमीयानगर सुरत व ज्ञानेश्वर धर्मा पाटील रा आर्थे ता शिरपुर यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यांचे कडुन लुटुन नेलल्या मुद्देमालापैकी १३ लाख ५० हजार रोख रक्कम व ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच इतर आरोपीतांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news