

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा-साक्री तालुक्यातील छाईल या गावात चोरट्याने घरफोडी करीत घरातील 40 हजारांच्या रोकडसह 20 हजारांचे दागिने मिळून एकुण 60 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
जयश्री रावसाहेब जाधव, रा. छाईल, ता.साक्री या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरामधील कपाटातील 40 हजार रूपये रोकडसह 20 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात चोरट्यावर भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ एस.एस.सावळे करीत आहेत.
हेही वाचा :