Dhule crime: अनैतिक संबंधाचा संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या नराधम पतीस जन्मठेपेची शिक्षा

मयताचा भाऊ पिन्टू काळू गायकवाड याने आरोपीविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

धुळे : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात दगड टाकून पतीने खून केला. या नराधम पतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे श्रीमती एस. एस. भिष्म यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यामध्ये सरकारी वकील गणेश पाटील यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भ देत या गुन्ह्यामध्ये आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

Murder Case
Dhule Crime | घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तिघांना शिरपूर पोलिसांकडून अटक; दोन गुन्ह्यांची उकल

साक्री तालुक्यातील डांग शिरवाडे येथील मंडाबाई दिलीप सोनवणे (वय ४८ ) या शेतामध्ये पिकांना पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या, मात्र त्या घरी परतल्याच नाहीत. तसेच त्यांचे पती दिलीप हिराजी सोनवणे हे देखील घरी नसल्यामुळे त्यांची मुलगी सोनाबाई दिलीप सोनवणे ही आई वडीलांना पाहण्यासाठी सकाळी शेतात गेली असता वडील शेतात बसलेले होते. व आई शेताच्या बांधावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. वडीलांनी मुलगी सोनाबाईला सांगीतले की, तुझ्या आईचे गावात ब-याच लोकांशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे माझी बदनामी होते. म्हणून मी तिला मारून टाकले, अशी माहिती दिली. काही वेळातच ही माहिती गाव शिवारात कळाली. त्यामुळे मयताचा भाऊ पिन्टू काळू गायकवाड याने आरोपीविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Murder Case
Dhule Crime | अपहरण करून ऑनलाइन खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

तद्नंतर आरोपी विरुध्द न्यायालयात भा.द.वि. कलम ३०२ अन्वये दोषारोपत्र दाखल करण्यात आले. याकेस कामी काही साक्षीदारांची साक्ष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. बी. डी. भोईटे यांनी घेतली. तसेच भोईटे यांची बदली झाल्यानंतर उर्वरीत साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साक्ष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील, यांनी नोंदविली.

Murder Case
Dhule crime : साक्रीत अफीम सदृश (दोडा) अंमली पदार्थांचा साठा जप्त, दोघांना अटक

या कामात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श श्रीमती एस. एस. भिष्म यांनी सदर खटल्यातील असलेल्या संपुर्ण पुराव्यांचा सांगोपांग विचार करुन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तसेच पाच हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षेचा आदेश पारीत केला. त्याचप्रमाणे मयताची मुलगी सोनाबाई दिलीप सोनवणे हिस फौ.व्य.सं. ३५७-अ तथा भारतीय नागरीक संहिता २००३ चे कलम ३९६ अन्वये जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत नुकसान भरपाई देण्याकरीता सुचित केले. सदर कामी फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील यांनी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श बी. डी. भोईटे यांनी काम पाहिले. त्याकामी त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर, यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news