Dhule Crime | मोकाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस आठ महिन्यानंतर अटक

आरोपी नाना विठ्ठल साळवे याच्यावर अनेक गुन्हे दाखल
Dhule Crime
MCOCA Act
Published on
Updated on

धुळे : मोक्का अंतर्गत दाखल गुन्हयातील फायटर ग्रुपचा स्वयंघोषीत प्रमुख ज्ञानसागर उर्फ नाना विठ्ठल साळवे यास 8 महिन्यांनंतर आझाद नगर पोलिसांची अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

धुळे शहरातील गायकवाड चौक येथे राहणारे सिध्दार्थ राजु देवरे हे त्यांच्या घरी असतांना त्याच परिसरात राहणारे फाईट ग्रुप स्वयंघोषीत प्रमुख ज्ञानसागर उर्फ नाना विठ्ठल साळवे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादी सिध्दार्थ राजु देवरे यास प्राणघातक हत्याराने पोटाजवळ, डावे पायावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच सिध्दार्थ देवरे याचे काका भांडण सोडविण्यासाठी आडवे झाले असता ज्ञानसागर उर्फ नाना साळवे याने त्यांना देखिल त्याचे हातातील प्राणघातक हत्याराने दिंगबर बाबुराव देवरे डोक्यावर मागील बाजूस वार करुन गंभीर जखमी केले. बाबत आझाद नगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Dhule Crime
Dhule Crime | निजामपूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत; ४ दिवसांची कोठडी

गायकवाड चौक येथे राहणारा ज्ञानसागर उर्फ नाना विठ्ठल साळवे याचे गुन्हेंगारी क्षेत्रातील मागील 10 वर्षांचा पुर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इतिहास पाहुन, यापुढे धुळे शहरात कोणीही कोणत्याही प्रकारे गुन्हेगार व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करु नये. साळवे व त्‍याच्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तेव्हापासुन फायटर ग्रुपचा स्वयंघोषीत प्रमुख ज्ञानसागर उर्फ नाना साळवे हा अटक टाळण्यासाठी फरार झाला होता. त्यादरम्यान नाना साळवे याने धुळे जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजी नगर येथे अटकपूर्व जामिन अर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न केला. परंतू आझाद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार व त्याचे पथकाने नाना साळवे याचा अटकपूर्व जामिन अर्ज मंजुर होवू दिला नाही.

दरम्यान नाना साळवे हा धुळ्यातील दिल्लीवाला जिन येथे येणार असल्याची मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सुचनाप्रमाणे गुन्हें शोध पथकातील पोहवा गौतम सपकाळ, योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, विजय शिरसाठ व मकसूद पठाण यांनी दिल्लीवाला जिन येथे सापळा लावून सुमारे ८ महिन्यांपासून फरार असलेला साळवे, यास अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news