धुळे पुढारी वृत्तसेवा- शहरातील चाळीसगाव रोड परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात तडीपार गुन्हेगारासह 17 जण जुगार खेळताना आढळून आले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव रोडवरील हयात हॉस्पीटल समोर संदीप पाटील ऊर्फ गग्गा यांचे मालकीचे घरात काही युवक ५२ पत्याची कॅटवर झन्ना-मन्ना नावाचा हारजितचा जुगार खेळत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने मिळाल्याने पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी लागलीच छापा कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई योगेश राऊत, प्रकाश पाटील, पोहेकॉ संदीप सरग, प्रकाश सोनार, तुषार सुर्यवंशी, मुकेश वाघ, चेतन बोरसे, रविकिरण राठोड, कमलेश सुर्यवंशी, योगेश जगताप, कैलास महाजन या पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवले.
त्याअनुषंगाने पथकाने चाळीसगाव रोडवरील हयात हॉस्पीटल समोरील संदीप पाटील ऊर्फ गग्गा यांचे मालकीचे घरी छापा टाकला. यावेळी काही इसम घोळका करुन ५२ पत्याची कॅटवर झन्ना-मन्ना नावाचा हारजीतचा जुगार खेळ खेळत असतांना मिळुन आले. या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांचे नावे नंदन अतुल वंव, मोहन अशोक गुजर, गौरव राजेंद्र कापसे, रईस शेख रहीम, भुषण सतिष सोनवणे, मनोज सुरेश केदार , सागर रमेश सोनवणे , अन्वर शेख शौकत, राकेश दुधा जाधव, मंहोमद खान हुसैन खान, प्रकाश मल्लीका अर्जुन चिंचोलीकर, रमजान अकवर मन्सुरी, राहुल श्याम वाघ, संदीप महेश पाटील , प्रतिक ऊर्फ मल्लु प्रकाश बडगुजर, मंहोम्मद हुसैन मंहोमद, हनिफ इरफान हुसैन खाटीक असे सांगितले.
मिळुन आलेले १७ जणांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत व घटनास्थळी ३६ हजार ५७० रुपये रोख रक्कम व ८५६०० रु. किं.चे एकुण ११ मोबाईल असा एकुण १,२२,१७०/- रु. किं.चा मुद्येमाल मिळुन आला. त्यांचे विरुध्द पोहेकॉ प्रकाश रणछोड सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे मुंबई जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छापा कारवाई मध्ये मिळुन आलेला आरोपी नामे प्रतिक ऊर्फ मल्लु प्रकाश बडगुजर वय ३४ रा. गायकवाड चौक, जुने धुळे यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी धुळे जिल्हयातुन दिनांक २९/०२/२०२४ पासुन १ वर्षा करीता हद्दपार केले असल्याने त्याचे विरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे पोहेकॉ संदीप धनाजी सरग यांचे फिर्यादीवरुन स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा –