धुळे : पानखेडा येथील केंद्रीय आश्रमशाळेत स्वच्छता अभियान

धुळे : पानखेडा येथील केंद्रीय आश्रमशाळेत स्वच्छता अभियान

पिंपळनेर (धुळे) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पानखेडा येथील केंद्रीय अनुसूचित जमाती निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत शाळेची इमारत, परिसर व वर्गखोल्या, क्रीडांगणाची परिसरातील रस्ते इत्यादींची साफसफाई करण्यात आली. कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता सप्ताह सुरू आहे. त्या अंतर्गत विद्यालयामध्ये स्वच्छतेचे महत्त्व, आपले आरोग्य व परिसर इत्यादी विषयांवर व्याख्याने सुरू आहेत. तसेच चित्रकला, रांगोळी व स्वच्छता विषयक गीते, तसेच पानखेडा गावात जाऊन स्वच्छतेबाबत जनजागृती करून गावात स्वच्छता अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news