Dhule APMC | धुळे बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश पाटील, उपसभापतीपदी संभाजी देवरे बिनविरोध

धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करत अभिनंदन केले
Dhule Bazar Samiti
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीPudhari
Published on
Updated on

Yogesh Patil Chairman Dhule APMC

धुळे: धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश विनायक पाटील यांची तर उपसभापतीपदी संभाजी पुंडलिक देवरे (राजपूत) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीतील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन सभापती योगेश पाटील यांनी दिली.

धुळे येथील बाजार समितीचे सभापती यशवंत दामू खैरनार व उपसभापती नानासाहेब देवराम पाटील यांचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक वृषाली पाटील यांच्या उपस्थितीत नूतन सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी सभापतीपदासाठी सायनेचे सरपंच योगेश पाटील तर उपसभापतीपदासाठी सावळदे (पो. नरव्हाळ) येथील संभाजी पुंडलिक देवरे (राजपूत) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Dhule Bazar Samiti
Dhule Drowning | निमडाळे तलावात दुहेरी दुर्घटना; वृद्धाचा मृतदेह शोधताना तरुणाचाही बुडून मृत्यू

धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी युवा नेते रायबा पाटील, माजी सभापती साहेबराव खैरनार, बाजीराव पाटील, माजी उपसभापती एन. डी. पाटील, महादेव परदेशी, गुलाबराव कोतेकर, गंगाधर माळी, ऋषिकेश ठाकरे, विशाल पाटील, नयना पाटील, छाया पाटील, विश्वास शिंदे, रावसाहेब पाटील, भागवत चितळकर, देवेंद्र पाटील आदी संचालक सदस्य उपस्थित होते.

या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी नवनित गोसावी, देवेंद्र पाटील, विशाल आव्हाड यांनी कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news