Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी : अनिल गोटे यांची मागणी

संरक्षण देणारे आणि त्याच्या भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करा
Anil Gote
Anil GotePudhari
Published on
Updated on

Ashok Kharat Case Supreme Court Inquiry Demand

धुळे: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अनेक प्रभावशाली राजकारण्यांशी संबंध असल्याचे समोर येत असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करावी, अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

या प्रकरणात केवळ संबंधित बाबावर कारवाई करून उपयोग नाही, तर त्याला प्रोत्साहन देणारे, संरक्षण देणारे आणि त्याच्या भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, असे गोटे यांनी स्पष्टपणे नमूद केले. अन्यथा अशा प्रकारची भोंदूगिरी थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Anil Gote
Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातचा अमानुष चेहरा! अल्पवयीन मुलीला केबल वायरने करंट देऊन केला अत्याचार

अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोटे यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या बाबांशी असलेल्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत देशभरात तथाकथित बाबांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

यावेळी त्यांनी आसाराम बापू आणि गुरमीत राम रहीम सिंह यांच्या उदाहरणांचा उल्लेख करत, अनेक मोठे राजकारणी त्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई झाल्याचेही निदर्शनास आणले.

Anil Gote
Ashok Kharat case | रूपाली चाकणकरच मुख्य सूत्रधार; भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

तसेच, अशोक खरात याच्या संपर्कात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आल्याचा दावा त्यांनी केला.

गोटे यांनी पुढे म्हटले की, अशा बाबांना सुरुवातीला कोणतीही विशेष ओळख नसते. मात्र राजकीय नेत्यांशी संबंध प्रस्थापित करून, त्यांच्या भेटीगाठींचा प्रचार करून ते प्रभाव निर्माण करतात. त्यामुळे सामान्य नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि अंधश्रद्धा वाढीस लागते.

Anil Gote
Ashok Kharat Case: भोंदूबाबा प्रकरणात मोठा खुलासा; ‘शिवानिका’ला पाणी देण्याच्या आदेशाची चौकशी

भोंदूगिरीच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या विचारांचा उल्लेख करत, समाजात पूर्वीपासूनच यावर टीका होत असली तरी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही, असे सांगितले.

एकंदर, अशा प्रकारच्या प्रकरणांना आळा घालायचा असेल तर केवळ बाबांवर नव्हे, तर त्यांना पाठबळ देणाऱ्या सर्व घटकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे गोटे यांनी ठामपणे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news