

Devendra Fadnavis on Kunal Patil
धुळे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. दरम्यान धुळे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मी माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून भारतीय जनता पक्षातील आगामी वाटचालीसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
मुंबईत माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पक्षात शक्ती प्रदर्शन करीत मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रवेश झाला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वरळी येथील भाजपाच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन कार्यक्रमात भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, धुळे तालुका व खानदेश विकासाचे ध्येय घेऊन काम करणारे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रत्येक विकास कामात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
दरम्यान, माजी आमदार कुणाल पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री जयकुमार गोरे, बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, माजी उपसभापती योगेश पाटील, संचालक विशाल सैंदाणे, खरेदी-विक्रीचे संचालक पंढरीनाथ पाटील, संचालक बापू खैरनार, ज्येष्ठ नेते गोकुळसिंग राजपूत, गणेश गर्दे आदी उपस्थित होते.