राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा

नाना पटोले
नाना पटोले
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा- कार्यकर्त्याकडून पाद्यपूजन करून घेणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी आज दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाय धुण्याच्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेचे धुळ्यात देखील पडसाद उमटले आहे. भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी या घटनेवरून नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे .

अनेक निवडणुकांमधील सततच्या पराभवांनंतर लोकसभा निवडणुकीत दिसलेला आशेचा एक किरण कॉंग्रेसमधील सरंजामशाहीला नवसंजीवनी देणारा ठरला असून नेतापूजनाची परंपरा पटोले पूजनापर्यंत पोहोचल्याचे आता पहावयास मिळत आहे. पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असून याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा ,अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे.

देशाच्या राजकारणात कॉंग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. याच परंपरेचा शिरकाव कॉंग्रेसमध्ये तळागाळात पोहोचला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. अनेक निवडणुकांत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या पटोले यांच्या अशा सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेस बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित्त म्हणून पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी सुरू करावी व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी या दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news