धुळे जिल्ह्यात खळबळ ! बंद घरात आढळले पती-पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेह

Dhule Crime News | चार दिवसांपासून घर बंद होतं, दुर्गंधी येऊ लागल्याने घटना उघडकीस
Dhule Crime News
बंद घरात आढळले पती-पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेहfile photo
Published on
Updated on

धुळे : धुळे शहरातील देवपूर परिसरात असणाऱ्या प्रमोद नगरात एका बंद घरात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे . यातील मयत व्यक्तीने गळफास घेतला असून त्याची पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळून आले आहेत. परिसरातील नागरिकांनी घरातून दुर्गंधी येत असल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.8 येथे राहणार्‍या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी चार मृतदेह घरातून मिळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्रमोदनगरमध्ये राहणारे प्रविण मानसिंग गिरासे (वय 52), त्यांची पत्नी दिपा प्रविण गिरासे (वय 44) व मुले चि. मितेश गिरासे ( वय 13 ) आणि चि. सोहम गिरासे( वय 18 ) अशा चार जणांचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या बंद घरात मिळून आले. साधारण तीन ते चार दिवसापूर्वी ही घटना घडली असावी. असा अंदाज आहे. गेल्या चार दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते. घरकामासाठी येणारी महिलाही गिरासे कुटुंब गावाला गेले असावे म्हणून ती दोन वेळा परत गेली. गॅस सिलेंडर देणारा देखील घर बंद असल्याने परत गेला होता. घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गिरासे यांचा घर बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मयत गिरासे परिवाराच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती दिली. मयत प्रविण गिरासे यांची बहीण संगिता योगेंद्रसिंग राजपूत यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने प्रविणचे घर गाठले. लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता घरातील एका रुममध्ये प्रविणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता. तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले. हे दृष्य पाहून संगिता यांनी एकच हंबरडा फोडला.

Dhule Crime News
Dhule | चितोड गावातील चौघा मयतांच्या आदिवासी वस्तीत आता स्मशान शांतता

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार, निलेश पोतदार, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण कौठुळे, हवालदार चंद्रकांत नागरे, हावलदार सुनील राठोड हे घटनास्थळी पोहोचले . तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी

नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

नेमकं काय घडलं असावं?

मयत प्रविण गिरासे हे मूळचे धुळे तालुक्यातील लोणखेडी येथील रहिवासी होते. शहरातील पारोळारोडवरील ग.नं.6 च्या कोपऱ्यावर असलेले कामधेनु कृषि सेवा केंद्राचे ते संचालक होते. एका सधन कुटुंबाशी संबंधीत असतांना या कुटुंबात घडलेली ही भयानक घटना धुळेकरांना सुन्न करणारी ठरली आहे. मयत प्रवीण यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे मात्र त्यांची पत्नी आणि दोघे मुले जमिनीवर पडलेले असल्यामुळे त्यांनी सामूहिक जीवन संपविले आहे किंवा आणखी काय याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news