धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघात सातव्या फेरीअंती काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी दोन लाख तेहतीस हजार 728 तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी दोन लाख 54 हजार 847 मते मिळवली आहेत. या मतांची गोळा बेरीज पाहता भारतीय जनता पार्टीला 21 हजार 119 मतांचा आघाडी मिळाली असून सर्व सहा मतदार विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत सुरू असल्याचे चित्र दिसून येते आहे.