कृषी केंद्रे दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान बंद ; प्रस्तावित कायद्यांच्या निषेधासाठी असोसिएशनतर्फे निवेदन

कृषी केंद्रे दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान बंद ; प्रस्तावित कायद्यांच्या निषेधासाठी असोसिएशनतर्फे निवेदन
Published on
Updated on

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; येथील फर्टिलायझर सीड्स, पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रस्तावित विधेयक क. 40,41,42,43 व 44 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे विक्री केंद्र बंदबाबत पिंपळनेर अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळकर, पिंपळनेर पोलिस ठाण्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, साक्री यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात पिंपळनेर अॅग्रो डीलर्स असोसिएशन(ता.साक्री)ही माफदा व सीड्स, पेस्टिसाइड, फर्टिलायझर डीलर्स वेल्फेअर असोसिएशन, धुळे या संस्थेच्या अधीन आहे. राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात ज्या जाचक अटी व नियम लागू करायचे ठरविले आहे, विक्रेत्यांना त्यांचा विक्री व्यवसाय करणे नवीन कायद्यामुळे अशक्य होणार असल्यामुळे विक्री केंद्र बंद ठेवण्याबाबतची माहिती आम्ही आपणास देत आहोत. संदर्भीय कायद्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्रे आज ता.2,3 व 4 नोव्हेंबर ला बंद राहणार आहेत.

पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, सपोनी श्रीकृष्ण पारधी यांच्यासह पंचायत समिती कृषी अधिकारी नेतनराव, तालुका कृषी अधिकारी सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.असोसिएशनचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ.नरेंद्र भदाणे, नीलेश भदाणे,मुकेश मराठे, रूपेश मराठे एखंडे,जगदीश पवार व सर्व कृषी असोसिएशनचे व्यापारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news