Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

पश्चिम पट्ट्यात भातरोपणी सुरू झाली असून, कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण भातशेतीस अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेतात चहूबाजूने उंच बांधणी करून भात रोपणीस सुरुवात झाली आहे.

या जातीच्या भाताची लागवड जोमात

इंद्रायणी, सुकवेल, चिमणसाळ, बासमती, खुशबू, भोवाड्या, डावाड्या, रूपाली यांच्यासह अनेकविध जातीचे भातरोपणी व लागवड सुरू झाली आहे. त्यात पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्यात जास्त उत्पादन व विक्री होत असलेला तांदूळ इंद्रायणी भाताचे सर्वाधिक क्षेत्र आहे. पिंपळनेर, वार्सा, दहिवेल येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात या पश्चिम पट्ट्यातील चांगल्या प्रतीचा गावरान तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध असतो. तसेच तांदळाचा सगळ्यात मोठा बाजार शुक्रवारी पिंपळनेर येथील गांधी चौकात भरत असल्याने आदिवासी शेतकरी थेट विक्रीसाठी भात आणतात.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news