धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील बल्हाणे येथे असलेल्या दोन हातभट्ट्यांवर पिंपळनेर पोलीसांनी आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे दिड लाखांचे साहित्य व दारुसाठा नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे ग्रामस्थ व महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत जात आहे.

पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाने आज सकाळी बल्हाणे शिवारातील बाबचापाडा येथील नाल्या मध्ये सुरु असलेल्या अवैध हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी अमृत देवाजी मोरे (३६) रा.बल्हाणे, ता.साक्री हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु गाळताना मिळून आला. पथकाने कारवाई करत एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचे साहित्य व दारूसाठा नष्ट केला. तर दुसरी कारवाई भटू रामदास माळी (२६) रा. बल्हाणे ता.साक्री याच्या अवैध हातभट्टीवर करण्यात आली. या ठिकाणी तो गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याच्या साहित्यासह दारू गाळताना मिळून आला. या कारवाईत एकुण ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, साक्री उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई.बी. जी.शेवाळे, पोको राकेश बोरसे, सोमनाथ पाटील, कैलास कोळी, महाले यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news