‘नाशिक झिलर्स’ची चामरलेणीवर स्वच्छता मोहीम

पंचवटी : स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे, शशिकांत पारख, स्वच्छता कर्मचारी व नागरिक.(छाया : गणेश बोडके)
पंचवटी : स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे, शशिकांत पारख, स्वच्छता कर्मचारी व नागरिक.(छाया : गणेश बोडके)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
'इंडियन स्वच्छता लीग' या स्पर्धेंतर्गत मनपाच्या 'नाशिक झिलर्स' संघाने मंगळवारी (दि.20) पंचवटीतील चामरलेणी येथे स्वच्छता मोहीम राबवून डोंगर परिसर चकाचक केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान 'स्वच्छ अमृत महोत्सव' हा विशेष उपक्रम देशभरातील शहरांमध्ये राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत 'इंडियन स्वच्छता लीग' या स्पर्धेला देशभरात सुुरुवात करण्यात आली. त्यानिमित्त पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे तसेच डोंगरांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नाशिक मनपाचा नाशिक झिलर्स हा संघ सहभागी झाला आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने, घनकचरा व्यवस्थापनाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी कैलास राभडिया व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत गजपंथ सिद्धक्षेत्र, चामरलेणी येथे 'स्वच्छ अमृत महोत्सव' या विषयावर विविध स्वयंसेवकांसोबत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात नामको कॉलेजचे सचिव शशिकांत पारख, प्राचार्य अवनी भणगे यांचे 30 विद्यार्थी व हर्षल इंगळे मित्र परिवार यांचे 20 स्वयंसेवक, कपिला बचाव मंचाचे योगेश बर्वे व त्यांचे सहकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक दुर्गादास मालेकर व 41 स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news