AMPC Election 2023 : कळवणला दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा, आतापर्यंत इतके मतदान…

AMPC Election 2023 : कळवणला दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा, आतापर्यंत इतके मतदान…

कळवण (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दुपारी २ वाजेपर्यंत ८१ टक्के मतदान झाले. दरम्यान दोनही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. हमाल तोलारी गटात १०० टक्के मतदान झाले आहे.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी विका सोसायटी गटाचे ५०३, ग्रामपंचायत गटाचे ७७३, व्यापारी गटाचे ४०६ , हमाल तोलारी गटाचे ११२ असे एकुण १७९४ मतदार होते. कळवण व कनाशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान घेण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत विका सोसायटी गटातून ४८३, ग्रामपंचायत गटातुन ७१९, व्यापारी गटातुन २४८, हमाल तोलारी गटातुन ११२ एकुन १५६२ मतदारांनी हक्क बजावला आहे.

सकाळ पासूनच दोनही पॅनलच्या नेते व कार्यकर्त्यांची मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी लगबग सुरु होती. मतदान प्रक्रीया शांतपणे पार पडली कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकरी विकास पॅनलच्या वतीने कनाशी येथे कळवण सुरगाणा मतदार संघाचे आमदार नितीन पवार, जिपच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जि. प सदस्य यशवंत गवळी, पस उपसभापती विजय शिरसाठ तर परीवर्तन पॅनलच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव, उमेदवार ज्ञानदेव पवार, पुंडलिक गवळी, योगेश गायकवाड हे तळ ठोकून बसले होते. तर कळवण येथे शेतकरी विकास पॅनलच्या वतीने नगराध्यक्ष कौतीक पगार, उमेदवार धनंजय पवार, भुषण पगार व समर्पक तर परीवर्तन पॅनलच्या वतीने पॅनलचे नेते व उमेदवार रविंद्र देवरे, भरत पाटील, शितलकुमार आहिरे सह समर्थक उपस्थित होते. या अटीतटीच्या लढतीत दोनही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news