

राहुरी : ‘अॅट्रोसिटी गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही,’ या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असलेली बातमी स्टेटसवर ठेवल्याच्या कारणातून एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करुन, टोळक्याकडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना रात्रीच्या सुमारास तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथे घडली. सुजित संजय पवार (25) असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मारहानीनंतर टोळके पसार झाले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
संजय पवार खडांबे बुद्रुक येथे कुटुंबासह राहतो. तो लॅब टेक्नेशियन व्यवसाय करतो. अॅट्रोसीटी गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी आदेश काढला. यासंदर्भात सोशल मिडियासह वर्तमान पत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या. सुजित पवार या तरुणाने त्या बातमीचा फोटो स्वतःच्या स्टेटसवर ठेवला होता. रात्री 9 वाजता गणेश पारे याने सुजित पवार याचे स्टेटस पाहून, त्याला कॉल केला. ‘तुझ्याशी बोलायचे आहे, तू गावातील श्रीशाहु विद्या मंदिर हायस्कुल शाळेजवळ ये,’ असे तो म्हणाला. सुजित पवार शाळेजवळ गेला असता, स्टेटस ठेवल्याच्या कारणातून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन, जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तू अॅट्रोसिटीचे स्टेटस ठेवतो का, आता दाखल कर, अॅट्रोसिटी आमच्यावर, असे टोळक्याने त्याला धमकाविले. मारहाणीमध्ये सुजित पवार याची अंगठी काढण्यात आली. टोळक्याने सुजित पवार याला ओढून चारचाकी वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला असता, सुजित पवार त्यांना धक्का देवून तेथुन पळाला.
सुजित संजय पवार याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गणेश पारे, (रा. खंडाबे खुर्द), नितीन भाउसाहेब कदम, (रा. धामोरी खुर्द), नितीन शाम जंगम, भाऊराव शिवाजी उगले (दोघेही रा. धामोरी बुद्रुक, ता. राहुरी) चौघांविरुद्ध शिविगाळ, मारहाण व अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर करीत आहे.https://www.youtube.com/watch?v=5DrPDL5xiJo