

crime incident in Jakhuri revealed by police
संगमनेर: तालुक्यातील जाखुरी येथील महिलेच्या हत्ये प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. भारत मोरे असे अटकेतील पतीचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रविवारी रात्री जाखुरीत संगीता मोरे हिची हत्या झाल्याची घटना घडली होती. अरुण माळी (रा.सायगाव, येवला) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बहिण संगीता ही पती भारत मोरे यांचेसोबत नागमठाण (वैजापूर) येथे राहत होती. (Latest Ahilyanagar News)
पतीसोबत पटत नसल्याने संगीता कोवीडच्या अगोदरपासून स्वतंत्र राहत होती. पुढे भारत मोरे याने दुसरे लग्न केले. ते दोघे जाखुरी येथे राहत होते. भाची शीतल आजारी असल्याने बहिण संगीताला भेटण्याकरीता आठ दिवसापूर्वी जाखुरी येथे गेली होती. दुसरे लग्न केल्याने भारत त्यांना सोबत राहू देत नसल्याच्या कारणातून संगीता व भारत यांच्यात भांडण झाले. त्यानंतर सोमवारी संगीता भारत मोरे हिचा मृतदेह वनखात्याच्या झुडपात सापडला.
संगीताच्या गळ्यावर जखमा झालेल्या व तोंडातून रक्त आले होते. संगीता ही भारत मोरेसोबत राहयाचे म्हणत होती, तर भारतला तिल सोबत राहू द्यायचे नव्हते. याच कारणातून त्याने संगीताची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी भारत मोरे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अटक करून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.