Flash drought compensation Nevasa: ओला दुष्काळ जाहीर करा; सर्व नुकसान भरपाई द्या – आमदार विठ्ठलराव लंघे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीवेळी नेवासा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत मागितली
Flash drought compensation Nevasa
ओला दुष्काळ जाहीर करा; सर्व नुकसान भरपाई द्या – आमदार विठ्ठलराव लंघेPudhari
Published on
Updated on

नेवासा : तालुक्यात गेल्या 25 मेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत भेट घेऊन सरसकट नुकसानभ रपाई देतांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पंचनामे करून शासनस्तरावर मदतीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.(Latest Ahilyanagar News)

ठिकठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबरमध्ये या आपत्तीचा अतिरेक झाला. तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक शेती पाऊस व पुराने उद्ध्वस्त झाली. अनेकांच्याा घरांची पावसाने पडझड झाली. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. फक्त शेतकरीच नव्हे, तर गावोगावचे छोटे व्यापाऱ्यांचेही पावसाने झाले. नुकसानग्रस्तांना उभारी देण्यासाठी शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदतीची घोषणा करावी, अशी मागणी आमदार लंघे यांनी केली.

Flash drought compensation Nevasa
Pankaja Munde flood relief survey: अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून दिलासा; मंत्री पंकजा मुंडे यांचा पाथर्डी दौरा

प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसा नभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

या मागणीला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शासन सर्व नुकसानग्रस्तांबरोबर आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया गतीने करून मदतीचा ठोस निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news