Political News: स्थानिक स्वराज्य संस्थावर भगवा फडकवा: उद्धव ठाकरे

मुंबईत बैठकीला काळे, खेवरे, गाडे, कोते यांची उपस्थिती
Ahilyanagar News
स्थानिक स्वराज्य संस्थावर भगवा फडकवा: उद्धव ठाकरे Uddhav Thackeray
Published on
Updated on

नगर: सुप्रीम कोर्टाने सूचना केल्या आहेत. कोणत्या ही क्षणी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईत सेना भवन येथे पक्षाचे खासदार, आमदार, शिवसेना नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिल्याची माहिती नगर शहरप्रमुख काळे यांनी दिली आहे.

Ahilyanagar News
Pudhari Impact: महानगरपालिकेची मोठी कारवाई; एफसी रोडसह दीपबंगला, काँग्रेस भवनसमोरील अतिक्रमणे काढली

यावेळी शखासदार संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, आमदार मिलिंद नार्वेकर, अहिल्यानगर संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्यासह जिल्ह्यातून माजीमंत्री शंकरराव गडाख, शहरप्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सचिन कोते, भारत मोरे उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, किरण काळे यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हा बुडत्या जहाजात तुम्ही उडी मारत आहात, असे त्यांना लोक म्हणत होते.

Ahilyanagar News
Gaja Marne Pune: गुंड गजा मारणेच्या साथीदारांची चार वाहने जप्त; इतर आरोपींच्या वाहनांचा शोध सुरू

जहाजाला भागदाड पडले किंवा जास्तीची गर्दी जहाजावर झाली, तर जहाज बुडते. पण ते जहाज कसे बुडू द्यायचे नाही, हे मला चांगले माहित आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आगामी मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा.

नगरची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे!

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नेते म्हणून खासदार संजय राऊत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या समवेत आमदार अनिल परब, उपनेते सुहास सामंत, साजन पाचपुते यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news